भोकर:(रमेश गंगासागरे) पशूसंवर्धन विभागानी शेतीला पूरक जोड धंदा असावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा म्हणून पंचायत समिती कडून अनूदानावर  दूधाळ जनावराचे वाटप करण्यात येणार आहे.तरी गरजू लाभार्थनी योजनेचा लाभ  घ्यावा असे आहवान ऊपसभापती सूरेश बिल्लेवाड यांनी केले आहे.
योजनेच्या या

• सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के व विशेष घटक प्रवर्गाकरीता 75 अनुदान
• 15 ते 29 नोव्हेंबर 2018 पर्यंत अर्ज करावे
   पंचायत समिती भोकर कार्यालयातर्फे राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदानावर 2 दुधाळ जनावरे किंवा शेळी गट 10+1 व 1000 मांसल पक्षीगृहे बांधकाम मिळण्यासाठी व विशेष घटक प्रवर्गाकरीता 75 टक्के अनुदानावर 2 दुधाळ जनावरे किंवा शेळी गट (10+1) / 1000 मांसल पक्षीगृहे बांधकाम मिळण्यासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. सदर अर्ज संकेतस्थळ https:/ah.mahabms.com वर दि. 15 ते 29 नोव्हेबर 2018 पर्यंत 15 दिवसात अर्ज भरण्यात यावा.
      लाभार्थी निवड प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने पुर्ण केली जाईल सुरूवातीला अर्ज भरताना कुठल्याही प्रकारचे कागद पत्र अपलोड करावे लागणार नाही. योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारले जातील. योजनेचे निकष असे आहेत, दुधाळ जनावरे, शेळी, 1000 मांसल पक्षी शेड, गटासाठी एका कुटूंबातून केवळ एकाच लाभार्थीना अर्ज करता येईल, अर्जदार दरिद्र रेषेखालील असल्यास प्रधान्य देण्यात येईल, योजनेत 30 टक्के महीला व 3 टक्के अपंग लाभार्थींना प्राधान्य देण्यात येईल, अर्जदाराने किंवा त्याच्या कुटूंबातील व्यक्तीने योजनेचा यापुर्वी लाभ घेतलेला नसावा,  आर्थिक तरतूदीस अधिन राहून योजनेचा लाभ लाभार्थीना देण्यात येईल. तसेच पशुपालकांनी जास्तीत जास्त योजनेचा लाभ घ्यावा,आसे आवाहन उपसभापती सुरेशभाऊ