भोकर:(रमेश गंगासागरे) गेल्या अनेक दिवसांपासून भोकरच्या डॉ.आंबेडकर चौकातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बिघडून गेली होती, नागरिकांना ईथुन चालणे कठीन झाले होते, अश्यातच काल दि,५ऑक्टोबर रोजी भोकर पोलिस ठाण्याचा पदभार घेतलेले कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चौधरी हे आज दि,६ ऑक्टोबर रोजी भोकर येथील डॉ. आंबेडकर चौक आणि बस्थानकाच्या समोरील रोडवर उभे राहून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अवैद्य वाहनासह हाथगाडे बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.
दिपावलीचा सण असल्याने बाजारात खरेदी करण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, बाजारात येणाऱ्या महिलांना व नागरिकांना ह्या अस्ताव्यस्त उभे राहणाऱ्या वाहनांमुळे चालणे कठीण होत होते,अश्यातच चौकात रस्त्याचे काम करण्यासाठी गुत्तेदाराने रस्ता खोदून ठेवला आहे,त्याचाही मोठा अडथळा नागरिकांना होत आहे,रस्ता खोदल्यावर गुत्तेदाराने सध्या येथील काम जाणीव पूर्वक बंद केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे, त्यामुळे येथील काम करून हा रस्ता तात्काळ वाहतुकीसाठी चालू करावा अशी भोकर व तालुक्यातील नागरिकांची मागणी आहे.तसेच यापुढेही या चौकातील वाहतुकीची कोंढि होऊ नये म्हणून चौकात चार पोलीस नायकाची नियुक्ती करावी अशी मागणी पुढे येत आहे.

![]() |
| वाहतूक व्यवस्था सुरळीत लावतांना पोलिस निरीक्षक चौधरी |

0 Comments