भोकर:(रमेश गंगासागरे) दि.२५ नोव्हेंबर रोजी भोकर शहरातील मुख्य रस्त्याने विनापरवाना टिपूसुल्तान जयंती काढून मा.जिल्हाधिकारी नांदेड यांच्या जमाव बंदीच्या आदेशाचे पालन न केल्याने शहरातील जवळपास १५ कार्यकर्त्यांवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
        फिर्यादी संजय भुजंगराव शिंदे यांनी दिलेल्या सरकारी फिर्यादी नुकसान पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवार दि,२५ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहरातील मुस्लीम बांधवांच्या वतीने हजरत टिपूसुल्तान आणि अब्दुल कलाम आझाद यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली होती, मात्र या जयंतीच्या मिरवणुकीला पोलीस प्रशाषणाने परवानगी नाकारली होती, काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी जयंती ची मिरवणूक काढली आणि त्यात तलवारीही (लाकडी)  फिरवून शहरात दहशत निर्माण केली, तसेच मा.जिल्हाधिकारी यांच्या जमाव बंदीच्या आदेशाची पायमल्ली केली, असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, त्यावरुन पोलिसांनी गु.र.न.३५०/१८, कलम १३५ बीपी ऍक्ट १८८आयपीसी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राठोड हे अधिक तपास करत आहेत.