जालना:(रमेश गंगासागरे) : अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर साहेब यांच्या आदेशानुसार इंजि. डी. टी.शिपणे साहेब यांचीअखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
             या वेळी राज्य उपाध्यक्ष इंजि. अशोक भोसले, युवा प्रदेशाध्यक्ष पुरूषोत्तम बोर्डे, युवा राज्य संघटक विनोद पुरभे, विदर्भ विभाग अध्यक्ष शरद खरात,मराठवाडा संघटक सुरेश गंगासागरे, साहित्यिक डॉ. प्रभाकर शेळके, डॉ. विजय कुमठेकर, धोंडोपंत मानवतकर, गणेश चांदोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आर. बी. वाघमारे हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रीय गायक हरिदास पुसे यांनी यावेळी क्रांतिगीते सादर केली.
            बुलडाणा जिल्हाध्यक्ष प्रकाश डोंगरे, जालना जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभाकर शेळके,औरंगाबाद जिल्हाध्यक्ष भरत खिरे, नांदेड युवक जिल्हा कार्याध्यक्ष संतोष बोराळकर, नांदेड जिल्हा प्रवक्ता गंगाधर गंगासागरे, जालना जिल्हा सचिव जालिंदर वाघमारे, पत्रकार बाबासाहेब डोंगरे, रोहिदास भगूरे, राजू डोंगरे, जगदीश सुरभय्ये, गणेश शिंदे, सचिन ईरच्छे,
 यांच्यासह ईतर मान्यवर उपस्थित होते.       
             बुलडाणा येथे येत्या 5 व 6 जानेवारी 2019 रोजी आयोजित पाचव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनाच्या नियोजनाबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच विविध पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.