भोकर:(रमेश गंगासागरे)
        येथे दि.२९ नोहेंबर रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या प्रांगणात संविधान गौरव दिनानिमित व क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती निमित भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
       देश स्वातंत्र झाल्यानंतर संविधान लिहिण्याची मोठी जवाबदारी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचेकडे आल्यानंतर आपल्या देशात वेगवेगळ्या जाती धर्म भेदभाव निर्माण करणारी संस्कृती अशा कठीन परिस्थितीत विध्दवतेच्या जोरावर सर्वांना न्यायदेणारी राज्यघटना २ वर्ष ११ महिणे १८ दिवसात लिहुन बाबासाहेबानी पुर्ण केली यानिमित केंद्र शासन दरवर्षी २६ नोहेंबर संविधान गौरव दिन साजरा करीत आहे. त्या निमित दि. २९ नोहेंबर रोजी सकाळी ११ वाजता मान्यवराचे उपस्थितीत संविधान उधेशिकेचे वाचन त्यांनतर विचारवंत  प्रा.डाँ.राजेश्वर पाटील स्वामी रा.वि.नांदेड भारिपचे मोहन राडोड यांचे संविधान व बिरसा मुंडा यांच्या विषयी मार्गदर्शन झाल्यानंतर प्रसिद्ध गायिका अश्विनी राजगुरू मुंबई, प्रसिद्ध गायक आनंद किर्तने, प्रसिद्ध कवाल सरवर जानी यांचा गायणाचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक एल.ए.हिरे, बी.आर.वाकोडे, दताजी डोंगरे, राजेश चंद्रे, भाउराव कावळे ,भिमराव दुधारे,सुभाष तेले आदिनी एका पत्रकाअन्वे केले आहे.