भोकर:(रमेश गंगासागरे) माझ्या पक्ष्याच्या माध्यमातून आम्ही व आमचे कार्यकर्ते ९५ टक्के समाजकार्य तर फक्त ५ टक्केच राजकारण करत असून पक्षाच्या वतीने अनेक समाजातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे, माझी पार्टी जातिभेदाला थारा देणारी पार्टी नसून जाती तोडो समाज जोडो अशी आहे असे उदगार प्रजासत्ताक समाजवादी भारत पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज शिवभगत यांनी काढले ते भोकर येथिल शाशकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पक्षाची मान्यता येण्यापूर्वी पासून मी, समाज कार्यात कार्यरत असल्याने मी सर्वदूर परिचित आहे, आता मागील वर्षी माझ्या पक्षाची मान्यता आली असल्याने त्या अनुषंगाने मी समाज कार्य करण्याचे ठरवले आहे, राजे छत्रपती शिवाजी महाराज जनकल्याण योजना नावाने मी बेरोजगार युवकांना रोजगार निर्मिती करून देत आहे,या योजनेच्या माध्यमातून नापरतावा दोनलक्ष तीनहजार आठशे रुपयांचे भागभांडवल देत आहे, त्यामुळे बेरोजगार युवक आत्महत्येचा विचार करणार नाहीत, असे ते म्हणाले, उमरी तालुक्यातील तुराटी येथील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील लोकांना माझ्या पार्टी तर्फे त्यांच्या शेतात एक बोअरवेल मारून देणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले, भोकर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या काळात मी उमेदवार देणार असून कोणाशीही युती न करता तसेच कोणालाही पाठींबा न देता स्वबळावर निवडणूक लढवनार आहे, जर जनतेनी आम्हाला निवडून दिल्यास मतदार संघातील पाच हजार युवकांना रोजगार देणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले आहे, या पत्रकार परिषदेत त्यांनी युती शाषणावरही कडाडून हल्ला चढवला ते म्हणाले की अंगणवाडीतील बालक कोपनचा तांदूळ खाऊन कुपोषण मुक्त कसा होणार, कुपोषण मुक्तीसाठी शासन ठोस पावले उचलत नाही, सकस आहार जर मिळाला तर भारत कुपोषण मुक्त मुक्त होईल, सर्वांना शिक्षण, अन्न, वस्त्र,आणि निवारा मोफत उपलब्ध करून दिला पाहिजे या विचारांची माझी पार्टी असल्याचे ते म्हणाले, यावेळी भोकर तालुक्यात नवीन पक्षबांधणी करण्यात आली असून पक्षाच्या तालुका अध्यक्ष पदी तरुण तडफदार आकाश मुदिराज, उपाध्यक्ष शिवाजी बैंग्णवाड, सचिव शिवानंद पिलेवाड,संजय भिसे, बाळू अटपलवाड, अभिजित स्वामी, श्रीकांत शेट्टे, अखिल शेख, गितेश बोरगावकर, योगेश राचुटकर, यांच्यासह अनेक युवकांना पार्टीत स्थान देण्यात आले असून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष पंकज शिवभगत यांच्या हास्ते निवड झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे, यावेळी नांदेड येथून पक्षाचे नेते सुरजितशिंग सरदार, नंदू माणिकमोते, शेख अहेमद, संदीप सदावर्ते, शेख शादुलभाई वाघालवाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

0 Comments