भोकर :( रमेश गंगासागरे) तालुका विधिसेवा समिती व तालुका अभियोक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि, २४ नोव्हेंबर रोजी न्यायालयात जेष्ठ नागरिकांसाठी घेण्यात आलेल्या भव्य शिबिरात शहर व तालुक्यातील हजारो जेष्ठ रुग्णाणी सहभाग घेतला होता, त्यामुळे न्यायालयाला मोठ्या रुग्णालयाचे रूप आले होते, न्यायालयाच्या आवारात या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायधिश श्री, संजयजी मोहरे यांच्या शुभ हास्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोकर चे जिल्हा न्यायाधीश मा.मुजीब शेख यांनी केले, प्रास्ताविक ऍड.शिवाजी कदम यांनी केले, कार्यक्रमात रक्तातील साखरेची तपासणी, बीपी ची तपासणी, लघवी तपासणी, ईसीजी, नेत्र तपासणी करून गरजू रुग्णांना चष्मे सुद्धा लगेच वाटप करण्यात आले, कार्यक्रमात रुग्णांना फळे, अल्पोपहार आणि शुद्ध पाणी यांचे वाटपही करण्यात आले, वयोवृद्ध रुग्णांना चालण्यास त्रास होत असल्यास त्यांना व्हीलचेअर वरून ने आन करण्यासाठी व्हीलचेअर ची व्यवस्था करण्यात आली होती, हे शिबिर यशस्वी होण्यासाठी डॉ, व्यंकट माने, तालुका विधिसेवा समितीचे ऍड.कुंटे, ऍड.मिलिंद देशमुख, ऍड.परमेश्वर पांचाळ, ऍड.कुंभेकर, ऍड.मुजाहिद, तर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ,ईनामदार, डॉ. उत्तम जाधव, डॉ,हुलसुरे, डॉ, रामनाईक जाधव, तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मुंढे आणि त्यांची टीम दिवसभर कार्यरत होती.
   तालुका केमिस्ट् आणि ड्रगिष्ट चे कार्य वाखानण्याजोगे 
भोकर तालुका केमिस्ट्र आणि ड्रगिष्ट चे तालुका अध्यक्ष राजू भाऊ रेड्डी यांनी या शिबिरासाठी लागणाऱ्या पूर्ण औषधी पुरवण्याचे काम केले,आणि रुग्णांना पूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी गज्जू पाटील, दिगंम्बर देशमुख, किशोर नरवाडे, साईनाथ पदमवार, प्रशांत जोशी, ईश्वर जाधव, अशोक रेड्डी, संजय नारलावार, धात्रक भाऊ, शुभम भाले, दत्ता लक्षटवार, सचिन तुमोड,आणि दत्ता रेड्डी कोतुरवाड यांनी परिश्रम घेतले,
याच बरोबर
  प्रयोग शाळा तंत्रज्ञ म्हणून डॉ.मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली 
ए.जी.पांचाळ, कविता कदम, राजू लोलपवाड, अनिल जाधव,यांनी काम पाहिले.
तर कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी भोकर चे जिल्हान्यायधीश मा.मुजीब शेख, न्यायमूर्ती पठाण,न्यायमूर्ती तळेकर मॅडम, न्यायमूर्ती 
न्यायमूर्ती त्रिभुवन यांनी काम पााहिले.