भोकर:(रमेश गंगासागरे) अनेक सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या भोकर न्यायालयाचे जिल्हा न्यायधीश मा.मुजीब शेख यांच्या संकल्पनेतून आता जेष्ठ नागरिकांसाठी येत्या शनिवार दि,२४ नोव्हेंबर रोजी सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
     मानव सेवा हीच श्रेष्ठ सेवा समजणाऱ्या तालुका विधी सेवा समिती आणि तालुका अभियोक्ता संघ भोकर यांच्या संयुक्तिक विद्यमाने नेहमीच समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येतात, त्याचाच एक भाग म्हणून जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याविषयी अडी अडचणी सोडविण्यासाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन न्यायालयाच्या आवारात करण्यात आले आहे, यात तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन गरजू रुग्णांना औषध, गोळ्या,टॉनिक, चष्मे यांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा न्यायधिश मा.मुजीब शेख यांनी दिली असून या शिबिरास मोठ्या प्रमाणावर जेष्ठ नागरिकांनी येऊन लाभ घ्यावा असे आव्हान ही त्यांनी केली आहे,या कार्यक्रमाचे उदघाटन नांदेड येथील प्रमुख जिल्हा न्यायधिश श्री,संजयजी मोहरे,यांच्या हास्ते होणार आहे, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायधिश एस.एस.खरात, व्ही.के.मांडेजिल्हा न्यायधिश, व्ही. टि. वसावे सदस्य सचिव जिवीसे प्रा.नांदेड, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, अभय देशपांडे उपविभागीय पोलिस अधिकारी हे येणार असून कार्यक्रमास जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दिवाणी न्यायधिश वरिष्ठ स्तर एन. पी.त्रिभुवन आणि तालुका अभियोक्ता संघाचे अध्यक्ष एस एस कुंटे यांनी केले आहे. कार्यक्रम न्यायालयाच्या आवारात होणार आहे.