भोकर शहरातील सईदनगर भागात सकाळ पासूनच शेकडो समाजबांधव जमन्यास सुरुवात झाली होती, यात जयंती मंडळाचे अध्यक्ष बाबूभाई तामसेकर,नगरसेवक शेख युसुबभाई , हामीदखान पठाण, ताजुद्दीन छन्नू भाई शेरवाले, सामाजिक कार्यकर्ते नाजीम भाई, शमीमोद्दीन ईनामदार, इलियास भाई, आणि असंख्य लहान मुले व मुली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण एकत्र येऊन येथून सजवलेल्या वाहनावर ध्वनिक्षेपक लावून त्यावर सामाजिक धून लावून वातावरण आंनदी बनवले होते, ही जयंती सईदनगर येथून सकाळी १० वाजता निघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक,शिवाजी महाराज चौक बस्थानक मार्गे दुपारी १ दरम्यान ईदगाह मैदानावर जात आहे. तिथे सामूहिक नमाज झाल्यावर जयंतीची सांगता होणार असल्याची माहिती जयंती मंडळाचे अध्यक्ष बाबूभाई तामसेकर यांनी दिली आहे.

0 Comments