![]() |
भोकर तालूक्यातील मौजे आमदरी येथे दि.१८ नोव्हेंबर रोजी क्रांतीविर बिरसा मूंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी ०९ वाजता बिरसामूंडा व डाॅ.आंबेडकर यांच्या प्रतिमेची सयुक्त रित्या भव्य मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूक विसर्जनानंतर सामाजीक कार्यकर्ते पत्रकार एल.ए.हिरे यांच्या हस्ते पिवळ्या ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत प्रा.मिरासे बोलत होते. अध्यक्षस्थानी जेष्ठ आदिवासी नेते चंपतराव मेंडके हे होते. या वेळी बोलताना मिरासे म्हणाले की राजरत्न या स्वतःच्या मूलाचा मृत्यु झाल्यानंतरही बाबासाहेब लंडनला गोलमेज परिषदेला जाउन मागासवर्गीयांचा आरक्षणाचा प्रश्न लावून धरला होता काँग्रेसनी वेळोवेळी बाबासाहेबाला विरोधच केला घटना समितीवर जाण्यासाठी अनेक अडथळे निर्माण केले होते परंतु घटना लिहण्याचे सामर्थ्य व विद्वता कोणातही नव्हती आदिवासी मागासवर्गीय बहूजनाना संविधानीक अधिकार देण्यासाठी ते रात्रंदिवस तळमळत होते आंबेडकर संविधान लिहले नसते तर तूम्हा आम्हाला गूलामीतच जिवन जगावे लागले असते असे सांगून प्रा.मिरासे म्हणाले आंबेडकरी विचाराशी आणि चळवळीशी ज्यांनी ज्यांनी बेईमानी केली त्यांचे बेहाल झाले. किनवटचे माजी आ.भिमराव केराम यांची कशी फरफटत होते याचे ताजे उदाहरण देत मिराशे म्हणाले भाजपचे सरकार मागासवर्गीयांचे आरक्षण बंद करु पहात असल्याचे सांगत गूजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूतळा उभारणीसाठी बावीस गावच्या आदिवासी शेतकर्यांची जमिन ताब्यात घेतली आहे. हे कोणत्याही मिडीया चॅनलवाल्यानी दाखवले नाही असा आरोप त्यांनी केला.
रावण हा आदिवासीचा राजा
===================
यावेळी बिरसामूंडा क्रांतीदलाचे डी.बी.अंबुरे म्हणाले श्रिलंकेचा राजा हा न्यायप्रिय होता राम हा कपटी होता रावणाची बहीण शुरपनका ही लक्ष्मणासोबत लग्न करण्याचा हट्ट धरला तेंव्हा रामाने लक्ष्मणास तिचे कान आणि नाक कापून विदृप केल्याने रावणाने चिडून सितेला पळवून नेवून अशोकवनात ठेवले. तिच्यावर कसलाली अत्याचार केला नाही रावण हा राक्षसी अवतार होता दहा तोंडे होती असा खोटा इतिहास लिहिला गेला आणि सितेविषयी संशय घेणार्या रामाला देव मानल्या जाते.हा रावणावर अन्याय आहे. पुराणातील काल्पनिक गोष्टी व भाकडकथावर विश्वास ठेवू नका असे आवाहन अंबुरे यांनी केले वेळी एकनाथ बूरकूले,माधव किरवले,दादासाहेब टारफे,एल.ए.हिरे यांचीही भाषणे झाली. यावेळी माजी सभापती शिवाजी देवतुळे, नागोराव कोठूळे, तूकाराम भिसे, बि.आर. वाकोडे, अॅड.गंगाधर वानोळे, पूंडलीक वागदकर, सदाशीव डोकळे,
भिमराव दूधारे, दत्ता डोंगरे, एकनाथ बूरकूले, धोंडीबा भिसे, सी.व्ही. चौदंते आदिसह महिला पूरुष उपस्थित होते सूत्रसंचलन लक्ष्मण वागतकर यानी केले तर आभार शिवाजी मेंडके यानी मानले.

0 Comments