परीक्षा हॉल मध्ये पाहणी करतांना प्रा.होगे
भोकर:(रमेश गंगासागरे) येथील डी बी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत घेण्यात येत असलेल्या बीए बीकॉम परीक्षा सुरळीत चालू आहेत.
       सदरील परीक्षेस १४ नोव्हेंबर पासून पोलीस बंदोबस्तात चालू असून याअभ्यास केंद्रावर विविध अभ्यास केंद्रावरील १६४४ विद्यार्थी परीक्षा देत आहेत, ईथे केंद्रप्रमुख म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य आणि अभ्यास केंद्र प्रमुख डॉ.पंजाब चव्हाण, अंतर्गत वरिष्ठ पर्यवेक्षक प्रा.होगे राधाकिशन आणि बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून मूदखेड येथील राजीव गांधी महाविद्यालयाचे प्रा.डॉ.मारोती देशमुख हे काम पहात आहेत, तर परीक्षा व्यवस्थापनाचे काम प्रल्हाद सूर्यवंशी, बादे लिंगारेड्डी, बेलकर पांडुरंग  डॉ. बेरदेवाड, प्रा.रायभोळे प्रदीप, पुपलवाड पांडुरंग, एम.डी. साजिद, ढवळे संजय, अनिल खर्चे, हे करीत आहेत,