भोकर:(रमेश गंगासागरे) तालुक्यामध्ये शहर शिवसेना जनसंपर्क कार्यालयांत हिंदुह्रद्यसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या सहाव्या स्मृतीदिनी अनेक शिवसैनिकांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
          शहरामध्ये नव्यानेच शिवसेना कार्यकारणी नुकतीच तयार करण्यात अाली आहे.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनाचे अौचित्य साधून भोकर शहर जनसंपर्क कार्यलयांत  असंख्य शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.यावेळी शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्त्ये शिवाजी पाटील किन्हाळकर, शहर प्रमुख माधव पाटील वडगांवकर(दक्षिण) ,शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार(उत्तर),माजी तालुका प्रमुख प्रदीप दौलतदार,भाजपा अोबिसी मोर्चा जि.अ.राजेश करपे,तालुका समन्वयक अँड परमेश्वर पांचाळ,पत्रकार अमोल पोलादवार,हनमंत कदम,सोहम शेट्टे,वैभव धोंडगे,परमेश्वर राव,शंकर नारमवाड,आकाश गेंटेंवाड,चंद्रकांत बरबडेकर आदींची उपस्थिती होती.