भोकर :(रमेश गंगासागरे) बिलोली येथील जेष्ठ पत्रकार श्री, राजेश गंगमवार यांचे हैदराबाद येथे दुःखद निधन झाल्याची वार्ता भोकर येथे कळताच त्यांना भोकर येथील पत्रकारांच्या वतीने शुक्रवारी दुपारी श्रद्धांजली वाहन्यात आली.
       शासकीय विश्रामगृह येथे जेष्ठ पत्रकार, एल.ए.हिरे यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या श्रद्धांजली पर कार्यक्रमात पत्रकार गंगमवार यांच्या कार्यावर अनेकांनी प्रकाश टाकला,हिंदी वार्ता पासून आपल्या कार्याला सुरुवात केल्यावर बिलोली येथून प्रतिनिधित्व करत अनेक वर्तमानपत्रात त्यांनी काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता, काही दिवसांपूर्वीच पत्रकार गंगमवार यांना फुफुसाच्या आजारामुळे हैदराबाद येथील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, ते उपचारास प्रतिसाद देत नसल्याने शेवटी १५ नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आई,वडील,बहीण,एक भाऊ,आणि दोन मुले असा परिवार आहे,
      या श्रद्धांजलीपर कार्यक्रमात पत्रकार रमेश गंगासागरे, बालाजी नारलेवाड, गौतम सरपाते,राजेश वाघमारे, सिद्धार्थ जाधव, पुंडलीक चिकल्पल्ले, अरुण डोईफोडे, उत्तम बाबळे,करखेलीकर, शंकर कदम,यांच्यासह अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.