भोकर :(रमेश गंगासागरे) काल दि, 11 नोव्हेंबर 2018 रोजी दिगांबर बिंदू महाविद्यालयातील य.च.म.मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र भोकर(8576A)अंतर्गत  पदवीव्युत्तर पदवी शिक्षणक्रमाची(M.A./ M.SC/ CPCT/HRC) कार्यशाळेसह संपर्क सञाचे उदघाटन कार्यक्रम घेण्यात आले.
       सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालये क्रिडाप्रमुख डाँ. माने व्यंकटराव तर उदघाटक म्हणून  नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शै. सल्लागार  डाँ. डी.एन. जामगे पाटील व प्रमुख मार्गदर्शक म्हणून  लोकमान्य महाविद्यालये सोनखेड येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख तथा केंद्र संयोजक सुर्यकांत पवार हे उपस्थित होते.
     या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र    मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अनेक शिक्षणक्रमाची माहिती सह विद्यापीठ व अभ्यास केंद्राची भुमिका विशद करुन मान्यवरांनी महाविद्यालये अभ्यासकेंद्र कार्यपध्दती विषयी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुञसंचालन केंद्र संयोजक प्रा. होगे राधाकृष्ण यांनी तर आभार प्रा. पुपलवाड पांडुरंग यांनी मानले .
कार्यक्रम  यशस्वीतेसाठी संमञक  डाँ. कांबळे भिमराव ,प्रा. रायभोळे प्रदीप, केंद्रसाह्यक प्रल्हाद सुंर्यवंशी व बादे लिंगारेडी यांनी प्रयत्न केले.
कार्यशाळेला सर्व शिक्षणक्रमाचे बहुसंख्य आध्यनार्थी उपस्थित होते .