भोकर :- (रमेश गंगासागरे) नांदेड रोडवरील नियोजित निर्मानाधीन उड्डाण पुलाखाली आताच मोठ्याप्रमाणात किरकोळ अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केल्याने भविष्यात पार्किंगची समस्या भेडसावणार असल्याचे दिसून येत आहे.
मागील दोन वर्षांपासून अत्यंत संथगतीने ह्या उड्डाणपुलाचे कार्य चालू आहे, आतातर सणासुदीच्या काळात डॉक्टर आंबेडकर चौकात मोठे खोदकाम चालू केल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे,ईथुनच अनेक शाळेतील मुला मुलींना जावे आणि यावे लागते त्यामुळे काही दिवसांपूर्वी शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांणी उपविभागीय अधिकारी यांना येथील वाहतूक सुरळीत करण्याची मागणी केली होती, त्यानंतर शिवसेना व भाजपाने सुद्धा हीच मागणी केली होती पण येथील वाहतुकीची कोंडी काही सुटली नाही, याच चौकात अवैद्य वाहतूक थांबत असल्याने महिला वृद्ध नागरिकांना इथून पायी चालणे जिकरीचे झाले आहे, आतातर नांदेड रोडवर तयार होत असलेल्या उड्डाणपुला खाली चहा चे ठेले,पान टपऱ्या चालकाईनी अतिक्रमण केले असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे,याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात ईतून चालणे कठीण झाल्याशिवाय राहणार नसल्याचे शहरातील नागरिक बोलत आहेत.

0 Comments