भोकर:- (रमेश गंगासागरे) डेबुजी यूथ ब्रिगेड महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा. श्री, राहुलभाऊ वरणकार यांच्या मार्गदर्शनाखाली, नांदेड जिल्हा मार्गदर्शक महेशजी मुखेडकर, जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली, भोकर येथिल राष्ट्रसंत गाडगेबाबा मंदिरात डेबुजी यूथ ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेची तालुका कार्यकारणी नुकतीच जाहीर कारण्यात आली. यात भोकर तालुका अध्यक्षपदी मा.श्री,चंद्रकांतभाऊ बरबडेकर, उपाध्यक्ष सुरजभाऊ तेलंगे, सचिव अदिनाथभाऊ चिंताकुटे, कार्याध्यक्ष गोविंदभाऊ सुर्यवंशी, संघटक सतिशभाऊ चिंताकुटे,बैठकीमध्ये बोलत आसताना जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ यानी म्हणले की लवकरच गाव तिथे शाखा आणी घर तिथे शिलेदार निर्माण करु, सर्व युवकांना संघटीत राहण्याचा संदेश दिले आहे. यावेळी भोकर शहरातील नवयुवक व समाजबंधु मोठ्या संख्येने उपस्थितित होते.

0 Comments