बुलडाणा:-(रमेश गंगासागरे) देवपूर तालुका जिल्हा बुलडाणा येथे अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेची शाखा मोठ्या उत्साहात स्थापन करण्यात आली.
देवपूर येथील समाजसेवक राजू बाबूलाल मांडवे यांची देवपूर सर्कल प्रमुखपदी तर दीपक मांडवे यांची देवपूर शाखा अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मोतीलाल किसन मांडवे, छोटीराम मोतीराम मांडवे, लक्ष्मण मोतीराम मांडवे, गणेश सुकलाल मांडवे, बाबूलाल मोतीराम मांडवे, रूपाबाई किसन मांडवे, सीताबाई छोटीराम मांडवे, उमाबाई लक्ष्मण मांडवे, सुनीताताई गणेश मांडवे, मंगलाताई राजू मांडवे,मनकर्णाबाई बाबुलाल मांडवे,मिनाबाई मोतीलाल मांडवे, सुमनबाई गणेश मांडवे आदिंची निवड करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे, राज्य उपाध्यक्ष इंजिनियर अशोकजी भोसले, राज्य कार्यकारिणी सदस्य शरद खरात, सल्लागार प्राध्यापक लक्ष्मण शिराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्व नवनिर्वाचित सदस्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.
![]() |
| (संस्थापक:श्री, चंद्रप्रकाश देगलूरकर) |

0 Comments