भोकर :- (रमेश गंगासागरे) मागील पाच दिवसापासून एमआयएम च्या वतीने भोकर चे तालुकाअध्यक्ष जुनेद पटेल हे विविध मागण्यांसाठी उपोषणाला दि, २२ ऑक्टोबर पासून बसले असून आज दि,२७ ऑक्टोबर रोजी उपोषणाचा सहावा दिवस आहे.
              तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील सर्व तलाठ्यानी आपल्या नेमून दिलेल्या सज्जा ला न रहाता भोकर शहरातील विविध गल्ली बोळात रूम भाड्याने घेऊन रहात आहेत, त्यामुळे खेड्यातील नागरिकांना ह्या तलाठयांचे कार्यालय सापडत नाही, तर भोकर येथील नागरिकांना ह्या तालाठयांच्या कार्यालयाचा खूप त्रास होतो आहे, त्यामुळे असे कार्यालय त्वरित बंद करण्यात यावेत,हे तलाठी शेतकऱ्याची लूट करत आहेत,७/१२ देण्यासाठी शेतकऱयाकडून ३० ₹ घेत आहेत, तर काही तलाठी स्वतः उपस्थित न रहाता खाजगी व्यक्तीकडून कार्यालयीन कामे करून घेत आहेत, ज्या ठिकाणी सज्जा आहे त्याच ठिकाणी जाऊन काम करण्यास भाग पाडावे,तसेच सातबाऱ्यासठी ₹ १५ ऐवजी ३० ₹ घेत असल्याने आतापर्यंत किती महसूल जमा झाला त्याबाबद माहिती देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे,
           आजशनिवारी उपोषणाचा सहावा दिवस असूनही या उपोषणाकडे कोणताच अधिकारी फिरकला नसल्याचे उपोषण कर्त्याने सांगितले आहे. उपोषण कर्त्याची तब्येत आता खराब होत असल्याने त्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी एमआयएम च्या कार्यकर्त्यांनी केली आहे.