बुलडाणा :- (प्रतिनिधी) : जामठी तालुका जिल्हा बुलडाणा येथे अखिल भारतीय अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद या अराजकीय सामाजिक संघटनेची शाखा स्थापन करण्यात आली.
             जामठी येथील समाजसेवक देवलाल दशरथ मांडवे यांची समता परिषदेच्या जिल्हा संयोजक या पदावर तर रामलाल दशरथ मांडवे, रामदास सिताराम मांडवे, सिताराम नारायण मांडवे, गजानन राजाराम मांडवे, श्याम रामलाल मांडवे यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली. सौ. गंगा शिवलाल मांडवे, विमलबाई रामलाल मांडवे, रेखाबाई देवलाल मांडवे, मंगलाबाई गजानन मांडवे, सीमाबाई रामदास मांडवे, झुमकाबाई सिताराम मांडवे, सुगरणबाई राजाराम मांडवे, रंजनाबाई संदीप मांडवे, गंगाबाई शिवलाल मांडवे आदि महिलांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
            यावेळी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे, राज्य उपाध्यक्ष इंजिनियर अशोकजी भोसले, राज्य कार्यकारणी सदस्य शरद खरात, सल्लागार प्राध्यापक लक्ष्‍मण शिराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे हार्दिक अभिनंदन करुन नियुक्ती प्रमाण पत्रांसह पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.