भोकर:-(रमेश गंगासागरे) भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेली आश्वासने पाळली नसून त्यांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे,त्यामुळे आता सत्ता परिवर्तन घडवून आणले पाहिजे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर येथील काँग्रेसने आयोजित केलेल्या जनसंघर्ष यात्रेत अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.
         शुक्रवार दि,२६ ऑक्टोबर संध्याकाळी ४ वाजता भोकर येथील मोंढा मैदानावर या जनसंघर्ष यात्रेचे भव्य आयोजन केले होते, व्यासपीठावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार नसीबखान, आमदार अमिता चव्हाण,नरसारेड्डी गोपीडवाड,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नागेलीकर,पंच्यायत समितीचे सभापती, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती, अशोक चव्हाण पुढे बोलतांना म्हणाले की, सध्या सर्वत्र महागाईने कळस गाठला असून सामान्य माणसांना जगणे मुश्कील झाले आहे, पेट्रोल आणि डिझेल चे दर आकाशाला भिडले आहेत, आजपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, भाजपच्या काळात शेतकरी आत्महत्या करीत आहेत,सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकऱ्या नाहीत ,त्यामुळे या सरकारला आता पायउतार केले पाहिजे असे ते म्हणाले, भोकर ते रहाटी पर्यंतचा रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे, रस्त्यात खड्डा आहे की,खड्ड्यात रस्ता आहे हे समजणे मुश्कील आहे असे ते म्हणाले, यावेळी विखे पाटील म्हणाले की, राज्य सरकार शिवस्मारकाची उंची कमी करून पैसे खात आहे,यावेळी भोकर चे आमदार सौ,अमिताभाभी नी पण राज्यसरकारवर जोरदार ताशेरे ओढले, कार्यक्रमाची सुरुवात पांढुरणा येथील शहीद झालेल्या सैनिकास श्रद्धांजली अर्पण करून तसेच कै, शंकरराव चव्हाण यांना आदरांजली वाहुन करण्यात आली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नागेलीकर यांनी केले कार्यक्रमास भोकर, मुदखेड आणि अर्धापुर तालुक्यातून हजारो नागरिक आले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामचंद्र मुसळे,हामीद पठाण,गोविंद मेटकर यांनी परिश्रम घेतले.